बाजाराचं भवितव्य सांगणारा गोल्डन क्रॉस (भाग-१)

सर्व पापांचा परिहार करण्यासाठी रक्ताचं शिंपडलं जाणं आवश्यक आहे, ते रक्त देवाचं म्हणजे परमात्म्याचं असावं जे त्याच्यापासून स्वेच्छेनं बलि-दान म्हणून दिलेलं असावं. मागील आठवड्यात ख्रिस्ती बांधवांमध्ये अत्यंत महत्वाचे असे जे दोन दिवस साजरे केले गेले, ते म्हणजे गुड फ्रायडे आणि पुनरुत्थान दिवस. गुड फ्रायडेच्याच दिवशी प्रभू येशू ख्रिस्ताला मानवजातीच्या पापांसाठी क्रॉसवर बळी दिलं गेलं व पुनरुत्थान दिवशी तो मेलेल्यांमधून पुन्हा जिवंत होऊन उठला. त्यामुळं तो पवित्र क्रॉस ख्रिस्तीजनांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो कारण त्या क्रॉसवर स्वतःचं बलिदान देऊन प्रभु येशू ख्रिस्तानं मानवजातीस सार्वकालिक जीवनाची आशा दिली. तशाच प्रकारे अजून एक क्रॉस आपल्या बाजारासाठी आशा देत आहे ज्याला गोल्डन क्रॉस म्हटलं जातं.

बाजाराचं भवितव्य सांगणारा गोल्डन क्रॉस (भाग-२)

पैकी पहिला क्रॉस हा अत्यंत पवित्र असून आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो तर दुसरा क्रॉस आपल्याला निफ्टीचं, म्हणजेच बाजाराचं भवितव्य सांगू पाहतो. तर पाहुयात की गोल्डन क्रॉस ही नक्की काय गोष्ट आहे.एका नामांकित ब्रोकरेज हाऊसच्या म्हणण्यानुसार, जसजसं लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे, तसतसं निफ्टी तक्त्यावरील संरचना ही मोठ्या कल-बदलाकडं दिशा दर्शन करीत आहे. निफ्टीनं गोल्डन क्रॉस ही संरचना १५ मार्च रोजी बनवली आहे व दैनिक तक्त्यावर ती आजमितीस टिकून देखील आहे. गोल्डन क्रॉस म्हणजे निफ्टी५० ची मध्यम कालावधीची चलत सरासरी व निफ्टी५० ची दीर्घ कालावधीची सरासरी यांचा पॉझिटिव्ह क्रॉसओव्हर. म्हणजेच निफ्टीच्या मागील पन्नास दिवसांच्या किंमतीच्या बंद भावांच्या सरासरीचं मूल्य हे तिच्या मागील २०० दिवसांच्या बंद भावांच्या सरासरी मूल्यापेक्षा वरचढ होणं. तर१५ मार्च २०१९ रोजी ही गोष्ट घडलीय. तेंव्हा निफ्टीची मध्यम कालावधीची म्हणजेच ५० दिवसांच्या बंद भावाच्या किंमतींची सरासरी होती १०८९० व दीर्घ कालावधीची म्हणजेच मागील २०० दिवसांच्या बंद भावांच्या किंमतीची सरासरी होती १०८८९.सध्या, अशाच प्रकारचे गोल्डन क्रॉसओव्हर हे निफ्टी५० निर्देशांकामधील निम्म्यांहून अधिक कंपन्यांच्या बाबतीत देखील आढळून येत आहेत. इ.स. २००० पासून आतापर्यंतची आकडेवारी सांगते की, अशी गोल्डन क्रॉस स्थिती ही फक्त १२ वेळा उद्भवलीय आणि त्यापैकी सर्वांत जास्त वाढ ही ११२ टक्के (ऑक्टो. २००४) नोंदवलीय तर सर्वांत कमी वाढ ही अर्धा टक्का (जाने. २००३) नोंदवली गेलेली आहे. खालील तक्ता पहा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.