मेस्सीला लागोपाठ तिसऱ्यांदा गोल्डन बुट

बार्सिलोना: पॅरिस सेंट जर्मनच्या अंतिम लिग सामन्यात किलियन एम्बापे याला चार गोल करण्यात अपयश आल्याने लियोनाल मेस्सी हा सलग तिसऱ्यांदा युरोपचा गोल्डन बूट पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू ठरला. मेस्सीचा हा एकूण सहावा गोल्डन बूट पुरस्कार आहे. मेस्सीने युरोपियन लिगमध्ये सर्वाधिक 36 गोल केले. त्याने बार्सिलोनाकडून खेळताना सहाव्यांदा अशी कामगिरी केली. अंतिम सामन्यापुर्वी एम्बापे याने 33 गोल केले होते. त्याला मेस्सीला मागे टाकण्यासाठी चार गोलची आवश्‍यकता होती. मात्र स्टेड डे रेम्स विरोधात त्याला एकमेव गोल करता आला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here