सोन्याला पुन्हा येणार झळाळी;पुढच्या महिन्यात गाठणार ५० हजाराचा टप्पा ?;काय आहे या मागचं कारण वाचा

मुंबई : सोन्याच्या किमतीत मागील काही महिन्यापासून चढउतार पाहायला मिळत आहे. सध्या सोन्याच्या दारात काही प्रमाणात घट झाली आहे. मात्र मार्च महिना सोन्याला झळाळी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयी तज्ज्ञांनी मत व्यक्त केले आहे. येणाऱ्या काळात सोने निश्चितच मोठा टप्पा गाठणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लोकांना आताच सोने खरेदी करण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला असून, आता सोने खरेदी केल्यास फायदा होईल असे म्हटले आहे.

शुक्रवारी सराफा बाजारातही काहीशी तेजी दिसून आली. सोन्याच्या किंमतीत 200 रुपयांनी घट झालेली दिसली. एमसीएक्समध्ये सोन्याचे दर 46,000 रुपयांच्या खाली घसरले. तर, एमसीएक्सवर चांदी 1200 रुपयांनी घसरून 68,000च्या जवळ आली आहे. शेअर बाजार आणि कमोडिटी मार्केट दोन्ही एकाचवेळी कोसळत आहेत, हे फार क्वचितच घडते आहे, परंतु शुक्रवारी बाजारात हेच दृश्य दिसून आले.

सोन्याच्या दराबद्दल माहिती देताना. पुढच्या महिन्यात सोन्याची किंमत 50000 रुपयांपर्यंत पोहोचेल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या रिफॉर्म धोरणामुळे यावर थोडासा दबाव आहे. पण, येणाऱ्या काळात सोने पुन्हा सावरेल, अशी अपेक्षा असल्याचा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

सोन्यावर सध्या दबाव पाहायला मिळत आहे.तसेच दागिने खरेदी केवळ भारतातच नव्हे, तर चीनमध्येही वाढेल. मार्च महिन्यात सोन्याच्या किंमतीत वाढ होईल, असे जवळजवळ सर्व तज्ज्ञांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.