नवी दिल्ली – बुधवारी दिल्ली सराफात सोन्याचे दर 38 रुपयांनी कमी होऊन 47,576 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. दिल्ली सराफात चांदीचे दरही 783 रुपयांनी कमी होऊन 68,884 रुपये प्रति किलो झाले.
जागतिक बाजारात सोन्याचे दर स्थिर असूनही भारतीय बाजारात सोन्याचे दर वाढले.
याबाबत एचडीएफसी सिक्युरिटीज संस्थेचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, डॉलरच्या तुलनेत रुपया वधारला. यामुळे भारतात सोन्याची आयात महागात पडत आहे.
त्यामुळे भारतात सोन्याचे दर वाढले आहेत. भारतात सोने जास्त प्रमाणात तयार होत नाही. त्यामुळे भारताला सोन्याची आयात करावी लागते. आयात महागात पडत असल्यामुळे सोने महाग झाले असल्याचे त्यांनी सांगितले. चांदीचे दरही याच कारणामुळे वाढले असल्याचे ते म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून रुपयाचा दर वाढत आहे. बुधवारी रुपयाचा दर तीन पैशांनी वाढून 72.84 रुपये प्रति डॉलर झाला.