नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार गुरुवारी सोन्याचा दर 52 रुपयांनी कमी होऊन 56,475 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
दिल्ली सराफात तयार चांदीचा दर 850 रुपयांनी कमी होऊन 68,500 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,901 व चांदीचा दर 24.23 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता.
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेस या संस्थेचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की, जपानच्या रिझर्व बॅंकेने व्याजदरात कसलीही वाढ केली नाही. त्यामुळे सोन्याचे दर काही प्रमाणात कमी झाले. गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत आणि आगामी काळातही या परिस्थितीत कसलाही बदल होणार नाही असे समजले जाते.