नवी दिल्ली – दिल्ली सराफात शुक्रवारी सोन्याचा दर 47 रुपयांनी वाढून 50, 729 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 496 रुपयानी वाढून 53,429 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतीक बाजारात सोन्याचे व चांदीचे दर वाढले. त्या प्रमाणात भारतीय सराफात सोने व चांदीचे दर वाढले असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढवून 1,702 डॉलर व चांदीचा दर 17.96 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता. आगामी काळामध्ये सोने आणि चांदीचे दर हा अस्थिर राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.