Gold – Silver Rates : डॉलर घसरताच सोन्याच्या दरात वाढ; चांदी स्थिर, पाहा लेटेस्ट दर
Gold - Silver Rates : कमजोर अमेरिकन डॉलरमुळे मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव सोमवारच्या 1,58,800 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या बंद भावावरून 1,500 रुपयांनी वाढून (सर्व करांसहित) 1,60,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला.

Gold – Silver Rates : कमजोर अमेरिकन डॉलरमुळे मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव सोमवारच्या 1,58,800 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या बंद भावावरून 1,500 रुपयांनी वाढून (सर्व करांसहित) 1,60,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटीज विभागाचे वरिष्ठ विश्लेषक, सौमिल गांधी म्हणाले, कच्च्या तेलाच्या किमतीतील घसरण आणि अमेरिकन डॉलर व ट्रेझरी बाँडच्या उत्पन्नातील घसरणीमुळे मंगळवारी सोन्याच्या दरात वाढ झाली. मात्र, चांदीचे भाव 2,55,700 रुपये प्रति किलोग्रामवर स्थिर राहिले.
आंतरराष्ट्रीय बाजारात, स्पॉट गोल्ड किंचित घसरून प्रति औंस 4,326.78 अमेरिकन डॉलरवर आले, मात्र चांदीचा भाव प्रति औंस 68.28 अमेरिकन डॉलरवर किंचित वाढला.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी औपचारिक युद्धविरामाच्या दिशेने प्रगती होत असल्याचे संकेत दिल्याने या संघर्षावर राजनैतिक तोडगा निघण्याच्या आशा वाढल्या. भू-राजकीय तणाव कमी झाल्यामुळे ऊर्जा-प्रेरित महागाईबद्दलची चिंता कमी होण्यास मदत झाली, ज्यामुळे अलीकडील घसरणीनंतर मौल्यवान धातूंना आधार मिळाला.



