नवी दिल्ली – जागतिक संकेताप्रमाणे दिल्ली सराफात सोन्याचा दर 163 रुपयांनी कमी होऊन 50,314 प्रति दहा ग्रॅम झाला.
तयार चांदीचा दर 195 रुपयांनी कमी होऊन 56,254 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,717 डॉलर 18.95 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक आर्थिक आघाडीवर अनेक अनिश्चित घटना घडत असल्यामुळे सोने आणि चांदीचे दर कमालीचे अस्थिर आहेत. या परिस्थितीत नजीकच्या भविष्यात फरक पडण्याची शक्यता कमी आहे.