मुंबई – दिल्ली सराफात आज सोन्याचा दर 50 रुपयांनी कमी झाली तर चांदीचा दर 187 रुपयांनी वाढला.
जागतिक संकेतानुसार सोन्याचा दर 50 रुपयांनी वाढून 51,483 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर तयार चांदीचा दर 187 रुपयांनी वाढून 66,827 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,930 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता. रशिया -युक्रेन युद्ध आणि अमेरिकेची व्याज दरवाढ या कारणांमुळे सध्या सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत. नजीकच्या भविष्यात या दाने धातूचे दर अस्थिर राहण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली.