नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार दिल्ली सराफात सोन्याचे दर 34 रुपयांनी वाढून 51,046 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले.
तयार चांदीचा दर मात्र 390 रुपयांनी कमी होऊन 61,657 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढून 1,856 डॉलर व चांदीचा दर 21.94 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता.
याबाबत बोलताना एचडीएफसी सिक्युरिटी या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत. कारण अमेरिकेच्या कर्जराख्यावरील परतावा कमी होत आहे. त्याचबरोबर डॉलर कमकुवत होत आहे. आगामी काळात सोन्याचे आणि चांदीचे दर अस्थिर राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.