नवी दिल्ली – दिल्ली सराफात शुक्रवारी सोन्याचा दर 205 रुपयांनी वाढून 55,210 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 30 रुपयांनी कमी होऊन 69,998 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,817 डॉलर प्रति औंस व चांदीचा दर 23.83 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता. सोन्याचे दर गेल्या 15 दिवसापासून कमालीचे अस्थिर आहेत.
या संबंधात बोलताना मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस या संस्थेचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की, अमेरिकेत बेकारी कमी झाल्याची आकडेवारी जाहीर करण्यात झाली आहे. त्यामुळे अमेरिका व्याजदरात वाढ कमी करेल असे काही गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे सोन्याची खरेदी होत आहे असे त्यांना वाटते.