नवी दिल्ली – दिल्ली सराफात सोन्याचा दर 25 रुपयांनी वाढून 51,027 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर मात्र 428 रुपयांनी कमी होऊन 61,557 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,859 डॉलर व चांदीचा दर 21.89 डॉलार प्रती औंस या पातळीवर गेला होता.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जगातील सर्वच बाजारामध्ये कमालीची अस्थिरता आहे. त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या बाजारावरही होणे अपेक्षित आहे. लवकरच अमेरिकेच्या पतधोरणाचाचे इतिवृत्त जाहीर होणार आहे. त्या वृत्ताच्या आधारावर आगामी काळात सोने आणि चांदीच्या दराना काही प्रमाणात दिशा मिळू शकेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर रशिया- युक्रेन दरम्यान रेंगाळलेल्या युद्धाचा सोने आणि चांदीच्या दरावर परिणाम होत असल्याचे ते म्हणाले.