नवी दिल्ली – जागतिक चलन आणि धातू बाजारातील परिस्थिती अस्थिर असल्यामुळे गुरुवारी सोन्याच्या दरात वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर सात रुपयांनी वाढून 46,503 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 198 रुपयांनी वाढून 63,896 प्रति किलो या पातळीवरील गेला.
जागतीक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,783 डॉलर व चांदीचा दर 24.18 डॉलर या पातळीवर आहे. सध्याच्या परिस्थितीत सोन्याचे आणि चांदीचे दर अस्थिर राहण्याची शक्यता असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.