नवी दिल्ली – दिल्ली सराफात सोमवारी सोन्याचा भाव 303 रुपयांनी वाढून 49,766 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर मात्र 222 रुपयांनी कमी होऊन 57,192 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,669 डॉलर व चांदीचा दर 19.27 डॉलर प्रति औंस झाला. एचडीएफसी सिक्युरीटीजचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात फेडरल रिझर्व्ह व्याजदरात मोठ्या प्रमाणात वाढ करण्याची शक्यता आहे. फेडरल रिझर्व्हच्या पतधोरणानंतर विविध बाजारांना दिशा मिळण्याची शक्यता आहे.