नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्यामुळे दिल्ली सराफात शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. दिल्ली सराफात सोन्याचा दर 433 रुपयांनी वाढून 57,025 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 990 रुपयांनी वाढून 69,208 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,932 व चांदीचा दर 24.02 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेस या संस्थेचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की, फेडरल रिझर्व फेब्रुवारीमध्ये व्याजदरात कमी म्हणजे 0.25% ची वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याची मागणी वाढून सोन्याच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असल्याचे दिसून येते.