नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर अस्थिर आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घट नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 295 रुपयांनी कमी होऊन 55,700 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 640 रुपयांनी कमी होऊन 64,380 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,831 व चांदीचा दर 20.80 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होता.
अमेरिकेत महागाई जास्त आहे. त्याचबरोबर बेरोजगारी वाढली आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रदीर्घकाळ व्याजदर वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे अमेरिकेतील कर्जरोख्यावरील परतावा वाढून चार टक्क्यापर्यंत गेला आहे. यामुळे डॉलरमध्ये गुंतवणूक वाढली आहे. अशा परिस्थितीत शेअर बाजार निर्देशांक कमी आहेत कमी होत आहेत.
सोने आणि चांदीतील गुंतवणूक डॉलरकडे वळत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे सोने आणि चांदीचे दर कमी होत आहेत असे विश्लेषकांनी सांगितले. वायदे बाजारातही सोने आणि चांदीचे दर कमी होत आहेत. त्यामुळे दीर्घ पल्ल्यात या दोन धातूंच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.