नवी दिल्ली – दिल्ली सराफात बुधवारी सोन्याचा दर 85 रुपयांनी कमी होऊन 50,487 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. दिल्ली सराफात चांदीचा दर मात्र 161 रुपयांनी वाढून 56,179 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,226 डॉलर व चांदीचा दर 18.98 डॉलर प्रति औंस या पातळीवर स्थिर होता.
या संबंधात बोलताना एचडीएफसी सेक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, अमेरिकेतील व्याजदर वाढ आणि रशिया- युक्रेन युद्धामुळे इतर बाजाराप्रमाणेच सोने आणि चांदीच्या बाजारात कमालीची अस्थिरता आहे. आगामी काही काळ तरीही अस्थिरता कमी होण्याची कसलीही शक्यता दिसून येत नाही. भारत सरकारने सोन्यावरील आयात शुल्क वाढविल्यामुळे सोन्याचे दर उच्च पातळीवर असल्याचे त्यांनी सांगितले.