नवी दिल्ली – युक्रेन- रशिया युद्ध मंदावण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे कालच्या प्रमाणे आजही सोन्याच्या दरात घट झाली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 200 रुपयांनी कमी होऊन 53,033 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
मात्र तयार चांदीचा दर 193 रुपयांनी वाढून 70,449 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,990 डॉलर व चांदीचा दर 25.84 डॉलर प्रति औंस झाला.
विश्लेषकांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर कमालीचे अस्थिर आहेत. युद्ध जोपर्यंत खात्रीने संपत असल्याची लक्षणे दिसत नाहीत तोपर्यंत या दोन धातूंचे दर अस्थिर राहण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.