नवी दिल्ली – विविध देशांच्या रिझर्व बॅंकांची पत धोरण ठरविण्यासाठी बैठक चालू आहे. त्याचबरोबर रशिया- युक्रेन युद्ध समाप्त होण्याची कसलीही लक्षणे नाहीत. या पार्श्वभूमीवर सोमवारी सोन्याचा दर 43 रुपयांनी वाढून 50,908 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
दिल्ली सराफात तयार चांदीचा दर 850 रुपयांनी वाढून 62,211 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,852 डॉलर व चांदीचा दर 22.28 डॉलर प्रति औंस होता.
जागतिक पातळीवर महागाई वाढत असल्यामुळे बरेच गुंतवणूकदार सोन्याकडे वळत असल्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर या आठवड्यामध्ये डॉलर कमकुवत झाल्यामुळेही सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचे सांगितले जाते.