नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार शुक्रवारी भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ नोंदली गेली.
सोन्याचा दर 77 रुपयांनी वाढून 50,037 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 379 रुपयांनी वाढून 63,869 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,896 डॉलर व चांदीचा दर 23.94 डॉलर प्रति औस झाला. एचडीएफसी सिक्युरिटीज चे विश्लेषक तपन पटेल म्हणाले की, युक्रेनमधील पेच प्रसंगामुळे सध्या सोन्याची खरेदी काही प्रमाणात वाढून सोन्याचे दर वाढत असल्याचे दिसून येत आहे.