नवी दिल्ली – दोन दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दारात काही प्रमाणात वाढ झाली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 211 रुपयांनी वाढून 54,270 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
तयार चांदीचा दर 593 वाढून 66,662 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,782 डॉलर आणि चांदीचा दर 22.71 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता.
सोने व चांदीच्या अस्थिर दराबाबत बोलताना मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले की, लवकरच अमेरिकेच्या फेडरल रिझर्वच्या पतधोरण समितीची बैठक होत आहे. त्याकडे गुंतवणूकदाराचे लक्ष आहे.