नवी दिल्ली – जागतिक बाजारात डॉलर वधारण्याबरोबरच रुपया घसरल्यानंतर भारतीय सराफात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घट नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 365 रुपयांनी कमी होऊन 51,385 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. (Gold-Silver Rate)
तयार चांदीचा दर 1,027 रुपयांनी कमी होऊन 55,301 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,721 डॉलर व चांदीचा दर 18.62 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेला होती. सकाळी भारतीय रुपयाचा भाव 31 पैशांनी कोसळला होता. त्याचाही सोने आणि चांदीच्या दरावर परिणाम झाला असल्याचे दिसून येते.
अमेरिकेमध्ये मंदीची शक्यता असल्यामुळे डॉलर वधारत आहे. शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होत आहेत. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूकही कमी होत असल्याचे दिसून येत आहे. (Gold-Silver Rate)