नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार दिल्ली सराफात सोमवारी सोन्याचा दर 351 रुपयांनी कमी होऊन 51,452 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
त्याचबरोबर तयार चांदीचा दर 561 रुपयानी कमी होऊन 68,182 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,933 डॉलर तर तयार चांदीचा दर 25.10 डॉलर प्रति औंस या पातळीवर होता.
जागतिक चलन बाजारात डॉलर बळकट होत आहे. त्याचबरोबर अमेरिकेच्या कर्जराख्यावरील परतावा वाढत आहे. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होत असल्यामुळे सोन्याचा दर कमी झाल्याचे दिसून येते.