नवी दिल्ली – जागतिक संकेताप्रमाणे भारतात सोन्याचा दर 140 रुपयांनी वाढून 47,268 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 290 रुपयांनी वाढून 61,099 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,807 डॉलर व चांदीचा दर 22.87 डॉलर या पातळीवर राहिला.
ओमायक्रॉन व्हायरसमुळे जागतिक धातू बाजारामध्ये अस्थिरता रंगण्याची शक्यता असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. महागाई वाढण्याच्या शक्यतेमुळे सोन्यामध्ये थोडीफर गुंतवणूक होत राहण्याची शक्यता आहे.