नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोने आणि चांदीचे दर स्थिर असले तरी भारतीय बाजारात मात्र सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली असल्याचे दिसून आले.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 294 रुपयांनी वाढून 51,236 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 523 रुपयांनी वाढून 62,577 रुपये प्रति किलो झाला. या संदर्भात बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, रशिया- युक्रेन युद्ध आणि वाढलेली महागाई या कारणामुळे सोने आणि चांदीसह विविध बाजारांमध्ये कमालीची अस्थिरता आहे.
त्यामुळे आगामी काळातही सोने आणि चांदीचे दर अस्थिर राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. भारतामध्ये सोन्याचे उत्पादन होत नाही. त्यामुळे जागतिक दरानुसार भारतातील सोन्याचे दर ठरत असतात.