Gold-silver prices today 21 oct 2024 : सोन्या-चांदीने आज म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या आकडेवारीनुसार, 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 804 रुपयांनी वाढून 78,241 रुपयांवर पोहोचला आहे. याच्या एक दिवस आधी त्याची किंमत 77,410 रुपये प्रति दहा ग्रॅम होती.
त्याच वेळी, चांदीच्या दरात 4,971 रुपयांनी वाढ झाली असून ती 97,254 रुपये प्रति किलो या भावाने विकली जात आहे. याच्या एक दिवस आधी चांदीचा भाव 92,283 रुपयांवर होता. यापूर्वी 29 मे रोजी चांदीने 94,280 रुपये प्रतिकिलो हा सार्वकालिक उच्चांक गाठला होता.
कॅरेटनुसार सोन्याचा भाव –
कॅरेट – किंमत (रु/10 ग्रॅम)
24 – 78214
22 – 71644
18 – 58,661
4 महानगरतील सोन्याचा भाव –
मुंबई : 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,000 रुपये आणि 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,640 रुपये आहे.
दिल्ली: 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,150 रुपये आणि 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,790 रुपये आहे.
कोलकाता: 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 73,000 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 79,640 रुपये आहे.
चेन्नई: 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 73,000 रुपये आणि 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 79,640 रुपये आहे.
या वर्षात आतापर्यंत सोने 14,889 रुपयांनी महागले –
तारीख – सोन्याची किंमत – चांदीची किंमत
1 जानेवारी – 63,352 रुपये प्रति 10 ग्रॅम : 73,395 रुपये प्रति किलोग्रॅम
21 ऑक्टोबर – 78,241 रुपये प्रति 10 ग्रॅम : 97,167 रुपये प्रति किलोग्रॅम