नवी दिल्ली – राजधानी दिल्लीतील सोन्याच्या किंमतीमध्ये आज २०० रुपयांची घट झाली आणि सोन्याचा भाव १० ग्रॅममागे ७९,१०० रुपये इतका झाला, असे ऑल इंडिया सराफा असोसिएशनने सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याच्या व्यापाराचा ट्रेन्ड कायम राहिल्याचे यावरून दिसून आले. ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा १० ग्रॅमसाठीचा भाव ७९,३०० रुपये इतका कायम राहिला.
चांदीच्या किंमतीत गेल्या तीन दिवसांपासून घट होत होती. मात्र आज चांदीच्या किंमतीमध्ये किलोमागे ५०० रुपयांची वाढ झाली. मंगळवारी एक किलो चांदीचा भाव ९१,५०० रुपये इतका होता. तो वाढून आज ९२ हजार इतका झाला. गेल्या तीन सत्रांमध्ये चांदीचा प्रति किलो भाव ५,५०० रुपयांनी घसरला आहे.
आज ९९.५ शुद्ध सोन्याच्या दरांमध्ये देखील २०० रुपयांची घट झाली. प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ७८,९०० रुपयांवरून २००रुपयांनी कमी होऊन ७८,७०० रुपये इतका झाला.
यूएस फेडरल रिझर्वच्या बैठकीच्या पार्श्वभुमीवर सोन्याच्या किंमतीबाबत सावध पवित्रा घेतला गेला आहे. २०२५ चा दृष्टीकोन आणि जॉब मार्केटसंबंधीच्या परिस्थितीवर लक्ष केंद्रित करून मल्टी कमोडीटी एक्सचेंज सोन्याचे भाव ७६,९५० रुपयांच्या जवळपास आहे. तथापि, मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव ४५ रुपये किंवा ०.०५ टक्क्यांनी घसरून प्रति किलो ९०,८३० रुपये झाला.