नवी दिल्ली – सोन्याचे दर आता उच्च पातळीवर गेल्यामुळे खरेदी कमी होत असल्याने नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी सोने ( Gold Price Today ) आणि चांदीच्या ( Silver Price Today ) दरात घट नोंदली गेली.
दिल्ली सराफात सोन्याचे दर 20 रुपयांनी कमी होऊन 49,678 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. दिल्ली सराफा तयार चांदीचा दर 404 रुपयांनी कमी होऊन 67,520 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारातही सोन्याचे दर कमी होऊन 1,895 डॉलर तर चांदीचे दर 26.34 डॉलर प्रति औंस झाले.
गेल्या काही दिवसात सोन्याच्या दरात सुधारणा झालेली आहे. आता नवीन वर्षात विविध बाजार बंद आहेत. त्यामुळे सोन्याची खरेदी होत नाही. परिणामी सोन्याच्या दरात घट झाली असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज विश्लेषक तपोवन पटेल यांनी सांगितले.