नवी दिल्ली – जागतिक बाजारात आज (दि. ९) सोन्याच्या भावात दहा रुपयांची कपात झाली असून, आज तुम्हाला २२ कॅरेट सोने खरेदी करायचे असेल तर त्यासाठी तोळ्याला ४४ हजार ९२० रुपये तर २४ कॅरेट सोन्यासाठी ४५ हजार ९२० रुपये मोजावे लागतील. तर दुसरीकडे आज चांदीचा भाव ७२ हजार २६३ वर पोहोचला आहे.
दरम्यान, दिल्ली सराफात शुक्रवारी (दि. ८) सोन्याचा दर ४७४ रुपयांनी वाढून ४७,१८५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर १,०५० रुपयांनी वाढून ७०,७९१ रुपये प्रति किलो झाला होता.
कोरोना महामारीत सुद्धा दिवसागणित सोने- चांदीचे दर चांगलेच उसळत आहे. आज सकाळी १० च्या सुमारास आंतरराष्ट्रीय बाजाराच्या सुरुवातीला सोन्याचा तोळ्याचा भाव ४७८८७ रुपये इतका होता.