नवी दिल्ली : जर आपण सणासुदीच्या काळात सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दारात चढ-उतार पहायला मिळत होते. त्यातच आता शनिवार (दि. 27) व रविवार (दि. 28) या दिवशी होळीचा सण आला असता. ही सोने खरेदीदारांसाठी सुवर्ण संधी आहे. खरंतर, शुक्रवारी सोन्याच्या किंमती10 रुपयांनी 100 रुपयांनी कमी झाल्या आहेत.
22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमसाठी 43, 920 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमसाठी 44, 920 रुपये द्यावे लागतील. तर चांदीचा भाव 345 रुपयांनी घसरून 64, 900 रुपये प्रतिकिलोवर आला. यापूर्वी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात 44 रुपयांची वाढ झाली होती. तर चांदीची किंमतही सुमारे 637 रुपयांनी घसरून 64110 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली होती.