नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दारात चढ-उतार पहायला मिळत आहे. त्यातच आता लग्नसराईचा हंगाम असल्यामुळे सोने-चांदी खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. सोन्याच्या आणि चांदीच्या आजच्या किंमतीचा विचारकारायचा झाला तर.
आज (दि. २५) १० ग्रॅम सोन्याची किंमत ४४, ८९७ रुपये आहे. त्याचबरोबर चांदीची किंमतही सुमारे ०.१६ टक्क्यांनी घसरून ६५१४० रुपयांच्या पातळीवर आली आहे. तर काही दिवसांपूर्वी सोन्या चांदीचा व्यापार ०.४५ टाक्यांनी वाढला होता.
तर सोमवारी (दि. २२) दिल्ली सराफात सोन्याचा दर ३०२ रुपयांनी कमी होऊन ४४, २६९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर तब्बल १,५३३ रुपयांनी कोसळून ६५, ३१९ रुपये प्रति किलो या पातळीवर गेला होता.