नवी दिल्ली – मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दारात चढ-उतार पहायला मिळत आहे. त्यातच आता होळीच्या सनापूर्वी सोने-चांदीच्या दारात चांगलीच वाढ झाली आहे. आज सोन्याच्या आणि चांदीच्या आजच्या किंमतीचा विचारकारायचा झाला तर. सोन्याचे दर वाढले असून चांदीचा भाव घसरला आहे.
आज (दि. 26) दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात 44 रुपयांची वाढ झाली आणि सोने प्रति 10 ग्रॅम 44347 रुपयांच्या पातळीवर बंद झाले. त्याचबरोबर चांदीची किंमतही सुमारे 637 रुपयांनी घसरून 64110 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. बुधवारी सोन्याचा दर 44303 रुपयांवर बंद झाला होता.
तर सोमवारी (दि. 22) दिल्ली सराफात सोन्याचा दर 302 रुपयांनी कमी होऊन 44, 269 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर तब्बल 1, 533 रुपयांनी कोसळून 65, 319 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला होता.