नवी दिल्ली – करोनाची लस येणार असल्याचे वृत्त आल्याने बुधवारी सोने आणि चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. कमोडिटी एक्सचेंज सीएमएक्स मध्ये सोन्याचे वायदे (सोन्याचा आजचा भाव) 91 रूपये म्हणजेच 0.18 टक्क्यांनी कमी होऊन 50,410 रुपये प्रति तोळा (10 ग्रॅम) झाला आहे. चांदीचे दरही 287 रूपये म्हणजेच 0.34 टक्क्यांनी कमी होऊन 62,832 रूपये प्रति किलोग्रॅम झाले होते.
करोना लसीच्या वृत्तामुळे सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण –
सोमवारी करोना विषाणूची लस येणार असल्याचे वृत्त आल्याने सोने-चांदीची मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याचे दिसून आले. गुंतवणूकदार सोन्यात गुंतवलेले पैसे काढून शेअर बाजाराकडे वळत आहेत. प्राॅफिट बुकिंमुळे सोने-चांदीच्या दरात घट झाली, असे तज्ञांचे म्हणणे आहे.