नवी दिल्ली -दिल्ली सराफात तयार चांदीचा दर 1,037 रुपयांनी कमी होऊन 66,128 रुपये प्रति किलो झाला. त्याचबरोबर सोन्याचा दर 312 रुपयांनी कमी होऊन 46,907 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,810 डॉलर तर चांदीचा दर 25.37 डॉलर प्रती औंस या पातळीवर गेला. भारतात आगामी काळात उत्सव येणार आहेत. त्यामुळे ग्राहक सोन्याची खरेदी करण्याची शक्यता आहे.