Gold Silver Price: देशाची राजधानी दिल्लीत बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव 600 रुपयांनी घसरून 77,700 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मंगळवारी हा मौल्यवान धातू 78,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.
ऑल इंडिया बुलियन असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, बुधवारी चांदीचा भावही 2,800 रुपयांनी घसरून 91,200 रुपये प्रति किलो झाला. गेल्या सत्रात चांदी 94,000 रुपये प्रति किलोवर बंद झाली होती.
दरम्यान, 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 600 रुपयांनी घसरून 77,300 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. कमकुवत देशांतर्गत मागणीमुळे पिवळ्या धातूच्या किमतीत घसरण झाल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे.