नवी दिल्ली – जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश आल्यामुळे भारतीय बाजारात सोने आणि चांदीचे दर बुधवारी कमी झाले. दिल्ली सराफात सोन्याचा दर 89 रुपयांनी कमी होऊ 46,167 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर चांदीचा दर 222 रुपयांनी कमी होऊन 67,926 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचा दर कमी होऊन 1,774 डॉलर तर चांदीचा दर 26.20 डॉलर प्रती औस या पातळीवर गेला. डॉलर वधारत असल्यामुळे सोन्याचे दर कमी झाले असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपसून इतर चलनांच्या तुलनेत डॉलर बळकट होत असल्यामुळे सोन्याचा भाव कमी होत आहे.