मुंबई – जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर रुपयाचे मूल्य कमी होत असल्यामुळे भारतीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 116 रुपयांनी वाढून 46,337 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
तयार चांदीचा दर 161 रुपयांनी वाढून 67,015 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. जागतिक बाजारात सोन्याचा दर वाढून 1,782 डॉलर प्रति औंस तर चांदीचा दर 26.13 डॉलर प्रति औंस झाला.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारातील दराप्रमाणे भारतातील वायदे बाजारात सोन्याचे दर वाढले. त्या प्रमाणात स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचे दर वाढल्याचे दिसून आले. सकाळच्या सत्रात रुपयाचे मूल्य सहा पैशांनी घसरले होते. रुपयाचे मूल्य सध्या एकूणच कमी पातळीवर असल्यामुळे आयातदारांना सोने महाग पडते.