मुंबई – जागतिक संकेतानुसार दिल्ली सराफात सोन्याच्या दरात केवळ 17 रुपयांची वाढ होऊन सोन्याचा दर 47,869 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 444 रुपयांनी वाढून 64,690 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला. सकाळच्या सत्रामध्ये रुपयाचा दर दहा पैशांनी कमी झाला होता. त्याचबरोबर शेअर बाजाराचा निर्देशांक कोसळला हाता.
या घडामोडीचा सोन्याच्या दरावर परिणाम झाला असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटी या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले. जागतिक पातळीवर महागाई वाढण्याची शक्यता असल्यामुळे आगामी काळात सोन्याच्या दरात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.