नवी दिल्ली – जागतिक आर्थिक परिस्थिती सुधारण्याची लक्षणे असल्यामुळे सोन्यातील गुंतवणूक कमी होत असल्यामुळे जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घट नोंदली जात आहे.
त्यामुळे भारतीय बाजारात शुक्रवारी सोने आणि चांदीच्या दरात घट नोंदली गेली. दिल्ली सराफात सोन्याचा दर 283 रुपयांनी कमी होऊन 46,570 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 661 रुपयांनी कमी होऊन 65,514 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
याबाबत एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत असल्यामुळे गुंतवणूक तिकडे वळत आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात घट झाली. भारतात सोन्याचे दर आणखीही कमी पातळीवर असल्यामुळे काही नागरिक लग्नासाठी आणि सणासाठी सोने खरेदी करण्याची शक्यता आहे.