नवी दिल्ली, दि. 22- जागतीक बाजारात सोन्याचे दर कमी झाले आहेत. त्याचबरोबर रुपयाच्या मुल्यात सुधारणा झाली आहे. या कारणामुळे भारतीय सराफात सोने आणि चांदीचे दर बरेच कमी झाल.
दिल्ली सराफात सोमवारी सोन्याचा दर 302 रुपयांनी कमी होऊन 44,269 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर तब्बल 1,533 रुपयांनी कोसळून 65,319 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
जागतीक बाजारातसोन्याचे दर कमी होऊन 1,731 डॉलर प्रती औंस तर चांदीचे दर 25.55 डॉलर प्रति औंस झाले. या घटनाक्रमाला बाबत एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, अमेरिकेच्या कर्जराख्यावरील परताव्याकडे जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष आहे.
या आठवडा अखेरीस या परताव्या संदर्भातील बाब स्पष्ट होणार आहे.
त्यामुळे काही गुंतवणूकदार सोन्याची विक्री करीत असल्याचे वातावरण आहे. डॉलरही वधारत असल्यामुळे त्याचा परिणाम सोन्याच्या दरावर होत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय सराफात काही महिन्यापूर्वी सोन्याचे दर 28 हजार रुपयांपर्यंत गेले होते. आता सोन्याचे दर 44 हजार रुपयांवर आले आहेत. त्यामुळे काही गुंतवणूकदार या परिस्थितीत खरेदी करण्याची शक्यता आहे.