नवी दिल्ली, दि.19- सोन्याचे दर सध्या बऱ्याच खालच्या पातळीवर असल्यामुळे गुंतवणूकदारांकडून खरेदीत होत असल्याने सोन्याच्या दरात वाढ होत आहे.
शुक्रवारी सोन्याचा दर 168 रुपयांनी वाढून 44,580 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. मात्र तयार चांदीचा दर शुक्रवारी 135 रुपयांनी कमी होऊन 66,706 रुपये प्रति किलो झाला. जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढून 1,741 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 26.12 डॉलर प्रति औंस झाले.
भारतात काही महिन्यापूर्वी सोन्याचे दर 58 हजार रुपयापर्यंत वाढले होते. आता ते 45 हजार रुपयांच्या खाली आहेत. त्यामुळे दागिण्यासाठी सोन्याचे खरेदी वाढत असल्याचे दिसून येत आहे.
मात्र जागतिक अर्थव्यवस्था सुधारू लागली असल्यामुळे सोन्याच्या दरात गेल्या वर्षीच्या इतकी वाढ होण्याची शक्यता कमी आहे असे विश्लेषक सांगतात.