नवी दिल्ली – जागतिक आर्थिक परिस्थिती सुधारत असल्यामुळे सध्या सोन्याचे दर कमी पातळीवर गेले आहेत. मंगळवारी भारतीय सराफात सोन्याच्या दरात अल्प सुधारणा नोंदली गेली.
तरीही सोन्याचे दर सध्या 44 हजार रुपयापेक्षा कमी पातळीवर आहेत.
दिल्ली सराफात मंगळवारी सोन्याचे दर 35 रुपयांनी कमी होऊन 43,996 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. तयार चांदीचा दर 553 रुपयांनी वाढून 65,621 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारात सोन्याचे दर 1,696 डॉलर प्रती औंस तर चांदीचे दर 25.50 डॉलर प्रति औंस पातळीवर स्थिर राहिले. याबाबत बोलताना एचडीएफसी संस्थेचे तपन पटेल यांनी सांगितले की, सध्या जागतिक आर्थिक परिस्थिती सुधारत असल्यामुळे गुंतवणूकदार सोने खरेदी बाबत जास्त उत्सुक दिसत नाहीत.
मात्र भारतामध्ये सोने लग्न आणि इतर कार्यक्रमासाठी घेतले जाते. त्यामुळे सध्याच्या पातळीवर भारतामध्ये खरेदी वाढण्याची शक्यता आहे.