Gold-Silver Price Today : स्वस्त झालं सोनं, चांदीही घसरली; जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाल्यामुळे आणि रुपयाचे मूल्य वाढल्यामुळे भारतीय बाजारातही मंगळवारी सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले.

दिल्ली सराफात सोन्याचा दर 679 रुपयांनी कोसळून 44,760 रुपये प्रती दहा ग्रॅम झाला तर तयार चांदीचा दर 1,847 रुपयांनी कमी होऊन 67,073 रुपये प्रति किलो झाला.

या घटनाक्रमाबाबत एचडीएफसी सिक्‍युरिटी संस्थेचे विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी झाले. त्याचबरोबर रुपयाचे मूल्य वधारले. त्यामुळे सोन्याची आयात स्वस्त झाली आहे.

या कारणामुळे भारतात मंगळवारी या दोन धातूच्या दरामध्ये मोठी घट झाली. जागतिक बाजारात सोन्याचे दर 1,719 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर कमी होऊन 26.08 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.