नवी दिल्ली – गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात बरीच घट झाल्यानंतर आता खरेदी वाढल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेने म्हटले आहे. जागतिक बाजारातही आज सोन्याचे दर वाढले.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 241 रुपयांनी वाढून 45,520 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
त्याचबरोबर दिल्ली सराफात तयार चांदीचा दर 781 रुपयांनी वाढून 68,877 रुपये प्रति किलो झाला.
एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे आणि रुपयाचे मूल्य वधारुनही सोन्याच्या दरात वाढ झाली.
जागतिक बाजारात सोन्याच्या दर 1,753 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 26.90 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेले. तरीही सोन्याचे दर सध्या बऱ्याच खालच्या पातळीवर आहेत. सोन्याचे दर 50 हजार रुपयांपेक्षा कमी असल्यानंतर खरेदी दीर्घ फल्यात फायदेशीर ठरू शकते असे विश्लेषकांना वाटते.