Gold-Silver Price Today : सोन्याच्या दरात ‘घट’; जाणून घ्या आजचा 10gmचा दर

नवी दिल्ली – गुरुवारी दिल्ली सरावात सोन्याचे दर 358 रुपयांनी कमी होऊन 45,959 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मात्र चांदीच्या दरात 151 रुपयांची वाढ होऊन चांदीचा दर 69,159 रुपये प्रति किलो झाला.

जागतीक बाजारात सोन्याचे दर कमी झाल्यामुळे त्या प्रमाणात भारतीय सराफातही सोन्याचे दर कमी झाले असल्याचे एचडीएफसी सिक्‍युरिटीज या संस्थेचे विश्‍लेषक तपन पटेल यांनी सांगितले. जागतिक बाजारांमध्ये सोन्याचे दर 1,792 डॉलर प्रति औंस तर चांदीचे दर 27.56 डॉलर प्रति औंस या पातळीवर गेल. कालही सोन्याच्या दरामध्ये घट झाली होती.

भारतात काही महिन्यापूर्वी सोन्याचे दर 58 हजार रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीपर्यंत गेले होते. नंतर सोन्याच्या दरात घट होत गेली. 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सोन्यावरील आयात शुल्कात पाच टक्‍क्‍यांची घट केली. त्यामुळे सोन्याच्या दरात आता विक्रमी पातळीवरुन दहा हजार रुपयापर्यंत घट झाली आहे.

सोन्याचे दर 50 हजार रुपयांच्या खाली असल्यानंतर दीर्घ पल्ल्याचा विचार करून गुंतवणूक करणाऱ्यांसाठी खरेदी फायदेशीर होऊ शकते असे विश्‍लेषक सांगतात. त्यांच्या मते यावर्षी सोन्याचा दर 63 हजार ते 68 हजारापर्यंत वाढू शकतो.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.