नवी दिल्ली – जागतिक आर्थिक परिस्थिती सुधारत असल्यामुळे सोन्याचे दर अस्थिर होऊ लागले आहेत. परिणामी भारतीय सराफात सोमवारी सोन्याच्या दरात काही प्रमाणात घट झाली.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 19 रुपयांनी कमी होऊन 46,826 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. मात्र चांदीचा दर 646 रुपयांनी वाढून 69,072 रुपये प्रति किलो झाला.
याबाबतची कारणमीमांसा करताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे तपन पटेल यांनी सांगितले की, रुपयाचा दर सकाळी 14 पैशांनी वाढल्यामुळे सोन्याच्या दरावर त्याचा परिणाम झाला. जागतिक बाजारात सोन्याचे दर कमी होऊन 1,819 डॉलर प्रति औंस झाले तर चांदीचा दर 27.48 डॉलर प्रती औंस या पातळीवर स्थिर राहिला.
अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्यात आल्यानंतर भारतीय बाजारात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. आता सोन्याचे दर योग्य पातळीवर असल्याचे समजले जाते. मात्र दीर्घ पल्ल्याचा विचार करून गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सोन्याचे दर पन्नास हजार रुपयांच्या खाली असल्यास खरेदी न पाहता हे होऊ शकते असे बरेच विश्लेषक सुचवितात.