Gold Silver price : दिवाळीनंतर सीजन सुरु होतो तो लग्नसराईचा…लग्न म्हटलं कि सोन्या-चांदीच्या दागिन्यांची मागणी देखील तेवढीच वाढत जाते. त्यातच सध्या सोन्या-चांदीचा भाव रोज नवनवीन विक्रम रचत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आज जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल तर हीच योग्य वेळ आहे. कारण सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे.
आज सोने (Gold Price) आणि चांदीच्या दरात (Silver Price) घसरण झाली आहे. त्यामुळे तुम्ही सोने खरेदीसाठी घराबाहेर पडू शकता. आज 9 डिसेंबर रोजी, शनिवारी सोन्याच्या दरात किंचित घट (Gold Rate ) झाली आहे.
आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 550 रुपयांनी कमी झाला आहे. आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 62,350 रुपये प्रतितोळा आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 57,150 रुपये आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 46,760 रुपये प्रतितोळा आहे.
आज सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही (Silver Rate Today) घसरण झाली आहे. शनिवारी एक किलो चांदी 1200 रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज एक किलो चांदीची किंमत 76,000 रुपये आहे.