नवी दिल्ली – जागतिक संकेतानुसार रविवारी आज (दि. १०) भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वाढ नोंदली गेली आहे. १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४८,६०० रुपये असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४८,२५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती.
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सातत्याने चढ उतार होत असल्याचे पहायला मिळत आहे. दर सतत कमी-अधिक होत असल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये देखील संभ्रमाचे वातावरण आहे. आणि आज देखील पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे दिसून आले.
आज रविवारी मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४८,६०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५३,०२० प्रति १० ग्रॅम आहे.
तर, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४८,७०० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५३,१२० रुपये असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६७१ रुपये आहे.