नवी दिल्ली -बरेच गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी सोने आणि चांदीचा वापर करीत आहेत. त्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत आहे.
दिल्ली सराफात शुक्रवारी सोन्याचा दर 474 रुपयांनी वाढून 47,185 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 1,050 रुपयांनी वाढून 70,791 रुपये प्रति किलो झाला.
जागतिक बाजारांमध्ये डॉलर कमकुवत होत असल्यामुळे सोन्याचा दर वाढत असल्याचे मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसचे उपाध्यक्ष नवनीत दमानी यांनी सांगितले.
जागतीक बाजारात सोन्याचा दर 800 डॉलरच्या वर गेले आहेत. ही पातळी सोन्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची समजली जाते असे दमानी यांनी सांगितले.