नवी दिल्ली – जागतिक धातू बाजारात कमालीची अस्थिरता आहे. या पार्श्वभूमीवर दिल्ली सराफात सोन्याचे दर वाढले तर चांदीच्या घरांमध्ये बरीच घट नोंदली गेली.
सोन्याचा दर 172 रुपयांनी वाढून 47,246 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 342 रुपयांनी वाढून 60,508 रुपये प्रति किलो झाला. रुपयाच्या मूल्यात सकाळी 17 पैशांची वाढ झाल्यामुळे सोन्याच्या दरावर परिणाम झाल्याचे दिसून येते.
जागतिक बाजारात सोन्याचा दर 1,797 डॉलर व चांदीचा दर 22.53 डॉलर प्रति औंस होता. आगामी काही काळ सोन्याचे दर अस्थिर राहण्याची शक्यता असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले.